जेनेलिया डिसूझाचा मनमोहक लूक; चाहते फिदा

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री जेनेलिया डिसूझा सोशल मीडियावर खूप सक्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

जेनेलिया डिसूजाची क्युट स्माईल नेहमीच चाहत्यांना आकर्षित करत असते.

ती नेहमीच सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर दररोज एकापेक्षा जास्त फोटो शेअर करत असते.

जेनेलियाचा फॅशन सेन्सही अप्रतिम आहे.

जेनेलिया डिसूझाने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला.

फोटोंमध्ये जेनेलियाने ऑफ व्हाइट साडी घातली असून स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे.

तसेच, कानातले आणि सुंदर बांगड्यांसह हलका मेकअप केला आहे.

या फोटोंमध्ये जेनेलिया खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोंवर चाहत्यांनीही आता कमेंटस करण्यास सुरुवात केली आहे.

एकाने लिहीले की, वहिनी मस्त दिसत आहेत. तर, दुसऱ्याने शब्दात मांडू शकत नाही.