हंसिका मोटवानी अडकली लग्नबंधनात; फोटो व्हायरल

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री हंसिका मोटवानी रविवारी सुहेल कथुरियासोबत विवाहबंधानात अडकली.

जयपूरच्या मुंडोटा किल्ल्यावर या जोडप्याने लग्नगाठ बांधली. हंसिकाच्या लग्नाच्या फंक्शनचेही अनेक फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.

दोघांवरही नव्या जीवनासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हंसिका मोटवानीने लग्नात लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

नववधूच्या जोड्यात हंसिकाच्या सौंदर्य अधिकच खुलले होते. तिच्यावर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत

तर, सुहेल कथुरियाने शेरवानी घातली होती. दोघेही मेड फॉर इच अदर वाटत होते.

जयपूरमध्ये २ डिसेंबरपासून हंसिका आणि सुहेलच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले.

लग्नाच्या विधींमध्ये सूफी नाईट, मेहेंदी, हळदी, संगीतात धमाका केला.

सुहेलने आयफेल टॉवरसमोर हंसिकाला प्रपोज केले होते. हे जोडपे आधीच एकमेकांचे बिझनेस पार्टनर होते. आता ते लाइफ पार्टनरही झाले आहेत.

हंसिका मोटवनीने टीव्ही विश्वातून पदार्पण केलं होते. तिने 'क्युंकी सास भी कभी बहु थी', 'शाका लाका बुम बुम', 'सोनपरी', अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. त्यानंतर तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं असून आपली एक वेगळी ओळख बनवली आहे.