प्रतिभावान अभिनेता ' गिरीश कुलकर्णी' यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Team Lokshahi

गिरीश कुलकर्णी हे एक प्रख्यात अभिनेता, लेखक, आणि उत्तम निर्माता सुद्धा आहेत.

वाळू, विहीर, देउळ, गाभ्रीचा पाऊस आणि जाउंद्या ना बाळासाहेब यांसारख्या गाजलेल्या मराठी चित्रपटांमधील अभिनयासाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात.

त्यांनी Netflix मालिका Sacred Games मध्ये देखील काम केले आहे.

त्यांनी रेडिओ मिर्चीचे क्लस्टर प्रोग्रामिंग हेड म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

त्यांचे बहुतांश चित्रपट हे सामाजिक प्रश्नांवर आधारित असतात.

देऊळ साठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पटकथा (सर्वोत्कृष्ट संवाद) साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, त्याचबरोबर 2017 मध्ये जाऊद्याना बाळासाहेब साठी झी चित्र गौरव आह्या अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले.

त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे.

दमदार व्यक्तिमत्व, प्रख्यात अभिनेता, उत्तम माणूस म्हणून त्यंची ख्याती आहे.