राणा दा आणि पाठक बाईंना लागली हळद

Shweta Shigvan-Kavankar

तुझ्यात जीव रंगला म्हणत अक्षया देवधर आणि हार्दीक जोशीने टेलिव्हिजनचा पडदा गाजवला.

मालिकेच्या सेटवर जुळलेल्या या गाठी आता आयुष्यभरासाठी एकत्र येत आहेत.

आज पुण्यात दोघांची एकत्र हळद पार पडली आहे.

दोघांचे हळदीचे फोटे समोर आला आहेत, लाडके राणा आणि अंजली या लुकमध्ये खूपच गोड दिसतायत.

दोघांनी हळदीसाठी सफेद रंगाची थीम निवडली आहे.

आज 1 डिसेंबरच्या मुहूर्तावर दोघांची हळद थाटामाटात झाली.

दोघांनी पंजाबी स्टाइल मोजडी देखील कॅरी केल्यात, अक्षयाची हेअर स्टाइलही सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

पुण्याच्या प्रसिद्ध ढेपे वाड्यात शाही विवाह सोहळा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.