रेड ड्रेसमध्ये हृता दुर्गुळेचा झक्कास लूक; चाहते फिदा

Shweta Shigvan-Kavankar

छोट्या पडद्यावरून पदार्पण करत मोठी प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे मोठ्या पडद्यावरही झळकली.

हृताने तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली.

सोशल मीडियावरही तिची मोठी फॅन फॉलोईंग आहे.

इन्स्टाग्रामवर २५ लाख फॉलोअर्स असलेली हृता ही एकमेव मराठी अभिनेत्री आहे.

नुकतेच तिने नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोत हृताने लाल रंगाचा स्लिम फिट रेड गाऊन घातला आहे.

सोबतच गळ्यात हार्ट शेपचा लॉकेट घालत आपला लूक पूर्ण केला आहे.

हृताच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले असून कमेंटचा वर्षाव केला आहे.

लवकरच हृताचा सर्किट सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यातील नवे गाणे लॉन्च करण्यासाठी हृताने हा खास लूक केला होता.

या चित्रपटात हृता पहिल्यांदाच वैभव तत्ववादीसोबत झळकणार आहे.