भारतातले पहिले हायब्रीड रॉकेट यशस्वीरित्या प्रक्षेपित

Shweta Shigvan-Kavankar

भारतातले पहिले हायब्रीड आणि पुन्हा वापरत येणारे रॉकेट १९ फेब्रुवारी २०२३रोजी पट्टी पुलम येथून यशस्वीरित्या लॉन्च झाले.

एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 चा भाग म्हणून विविध राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांनी बनवलेले एकूण 150 उपग्रह रविवारी रॉकेट सोडण्यात आले.

तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन यांनी तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील पट्टीपोलम गावातून या कार्यक्रमाची सुरुवात केली.

डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनने मार्टिन फाऊंडेशन आणि स्पेस झोन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कल्पकम अणु संशोधन केंद्रासह रॉकेट प्रक्षेपणाचे आयोजन केले होते.

या उपक्रमाद्वारे, देशाच्या विविध भागांतील 5,000 हून अधिक विद्यार्थ्यांना 150 PICO उपग्रहांची रचना आणि विकास करण्यास सक्षम केले गेले.

यात पूर्ण प्रज्ञा शिक्षण केंद्र - मुंबई या शाळेतील अथर्व खंडाळकर नावाच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग होता.

अथर्व खंडाळकर या विद्यार्थ्याने ऑल इंडिया रॉकेट सायन्स आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन परीक्षेत 12 वा क्रमांक पटकावला.

अथर्वचे सर्वच स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.