जॅकलिनचा ग्लॅमरस अवतार सोडून आदिवासी लूक; चाहत्यांनी म्हंटले, दुसरे मिळाले नाही का?

Shweta Shigvan-Kavankar

बॉलीवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक जॅकलिन फर्नांडिस आहे.

सोशल मीडियावर जॅकलिन मोठ्या प्रमाणावर अ‍ॅक्टीव्ह असते.

ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

आता जॅकलिन फर्नांडिसने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये तिने फिदर आणि मोत्यांनी बनवलेला वन शोल्डर ब्लाउज आणि मोत्यांचा स्कर्ट घातला आहे.

तर जॅकलिनने फ्लोअर टच श्रग देखील घातला आहे.

जॅकलिनच्या या लूकने सर्वांची मनं जिंकली.

तिच्या या पोस्टवर एका चाहत्याने 'आणखी काही घालायचे नाही का' अशी कमेंट केली, तर दुसऱ्याने 'तू आदिवासींच्या राणीसारखी दिसत आहेस', असे लिहिले आहे.

जॅकलीन नेहमीच तिच्या स्टायलिश आणि अनोख्या आउटफिट्समुळे चर्चेत असते.