Shweta Shigvan-Kavankar
जान्हवी कपूर आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असून नवनवीन फोटो शेअर करत असते.
नुकतेच जान्हवीने रॉयल फोटोशूट केले आहे. हे फोटो तिच्या एका मॅगझिन शूटचा भाग आहेत.
जान्हवीने राजघराण्यातील राण्यांप्रमाणे जड लेहेंगा परिधान केला आहे.
तर, सोबत तिने मांगटिका व कानात मोठमोठे झुमके घातले आहेत.
या विंटेज लूकमध्ये जान्हवीच्या सौदर्यांत कुंदन चोकर नेकलेसने आणखी भर घातली आहे.
या लूकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.
हे फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये मी खरोखर प्रार्थना करते की मला एक पीरियड फिल्म करायला मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
जान्हवीचे हे फोटो आणि स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे.
जान्हवी कपूरचा नुकताच मिली चित्रपट रिलीझ झाला होता.