Kajal Aggarwal Birthday : टॉपलेस होण्यापासून ते कॉस्टारला जबरदस्ती किस करण्यापर्यंत, या वादांमुळे चर्चेत

shweta walge

काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आज तिचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. 19 जून 1985 रोजी मुंबईत जन्मलेल्या काजलने तमिळ, तेलगू, मल्यालम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या काजल अग्रवालने कॉलेजच्या दिवसांपासून मॉडेलिंगला (Modeling) सुरुवात केली. यानंतर तिने 2004 मध्ये 'क्यों हो गया ना' या बॉलिवूड चित्रपटातून (Bollywood movie) आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

काजल साउथ इंडस्ट्रीकडे (South Industry) वळली आणि 2007 मध्ये 'लक्ष्मी कल्याणम' मधून तेलुगु फिल्म इंडस्ट्रीत (Telugu film industry) पदार्पण केले. यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री बनली. 2009 मध्ये आलेल्या मगधीरा या तेलगू चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली.

रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) सिंघम या चित्रपटातून काजलने बॉलिवूडमध्ये (Bollywood) पाऊल टाकले आणि या चित्रपटातील तिच्या कामाचेही कौतुक झाले.

काजल अनेक वेळा तिच्या वादांमुळे देखिल चर्चेत आली आहे. 2014 मध्ये तिने एका मैगजीनसाठी केलेल्या टॉपलेस फोटोशूटचे (Topless photoshoot) फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिने असे कोणतेही फोटोशूट केलेले नाही, असे काजलच्या वतीने सांगण्यात आले. तिच्या फोटोंशी छेडछाड करण्यात आली आहे.

यानंतर, 2016 मध्ये ती रणदीप हुड्डासोबत (Randeep Hooda) 'दो लफ्जों की कहानी' या चित्रपटात दिसली. या चित्रपटात दोघांमध्ये एक किसिंग सीन (Kissing scene) दाखवण्यात आला होता. काजलला या सीनबद्दल काहीच कल्पना नव्हती, असं म्हटलं जातं. या सीनमध्ये रणदीपने तिला अचानक किस केले, ज्यानंतर तिला खूप राग आला आणि खूप ड्रामा देखिल झाला.

यंदाच्या मदर्स डेच्या (Mother's day) निमित्ताने काजल अग्रवालने तिच्या आईसाठी एक कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे. काजलने कवितेसाठी लेखकाला श्रेय किंवा परवानगी दिली नाही. यानंतर अभिनेत्रीच्या पोस्टवर आक्षेप घेत कविता लिहिणाऱ्या सारा या इन्स्टाग्राम यूजरने कॉपीराइट (Copyright) उल्लंघनाची तक्रार दाखल केली होती.

काजल अग्रवालच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, तिने 30 ऑक्टोबर 2020 रोजी उद्योगपती गौतम किचलूशी (Gautam Kichlu) लग्न केले. त्याच वेळी, यावर्षी 19 एप्रिल रोजी त्यांनी आपल्या मुलाचे या जगात स्वागत केले आहे.