काजल अग्रवालने पहिल्यांदाच दाखवला लाडक्या लेकाचा चेहरा; चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूड अभिनेत्री आणि साऊथ स्टार काजल अग्रवाल सध्या तिचा मुलगा नील किचलूसोबत क्वालिटी टाईम घालवत आहे.

20 एप्रिल रोजी काजलचा लाडका लेक एक वर्षाचा झाला आहे.

नीलच्या वाढदिवशी काजलने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा चेहरा दाखवला आहे.

नीलचे काही अतिशय गोंडस फोटो शेअर करत तिने एक खास नोटही लिहिली आहे.

यामध्ये नीलने पिवळा शर्ट घातला आहे आणि कॅमेऱ्याला एक सुंदर स्माईल देत आहे.

फोटो शेअर करताना काजलने कॅप्शनमध्ये लिहिले, आणि असाच आमचा सनशाइन 1 वर्षाचा झाला नील.

ऑक्टोबर 2020 मध्ये काजल प्रियकर गौतम किचलूसोबत विवाहबंधनात अडकली होती.

काजल ही साऊथची प्रसिद्ध स्टार आहे. तसेच तिने आपल्या अभिनयाने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले आहे.

अजय देवगणसोबत 'सिंघम' चित्रपटात ही अभिनेत्री दिसली होती.