Kantara Actress: कांतारा चित्रपटातील 'लीला'ने शेअर केले बोल्ड फोटो, चाहते म्हणाले 'खरंच तू...'

shweta walge

आजकाल साऊथ चित्रपट कांतारा सगळीकडे जोरात आहे. या चित्रपटाची कथा, संवाद आणि गाणी लोकांना आवडत आहेत. त्याचबरोबर चित्रपटात लीलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सप्तमीला लोक खूप प्रेम देत आहेत.

कांतारा सुपरहिट झाल्यानंतर सप्तमी गौडा लोकांच्या पसंतीस उतरत आहे. सप्तमी गौडा ही कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अवघ्या दोन वर्षात तीने आपल्या कारकिर्दीत उंची गाठली आहे.

सप्तमी गौडाचा जन्म 1996 मध्ये बंगळुरूमध्ये झाला. ती फक्त 27 वर्षांची आहे. अभिनेत्रीचे वडील सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सप्तमी ही राष्ट्रीय जलतरणपटूही राहिली आहे.

सप्तमीने 2020 मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पॉपकॉर्न मंकी टायगर हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

याशिवाय सप्तमी गौडा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. अभिनेत्री इंस्टाग्रामवर तिचे सुंदर फोटो शेअर करते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडते.

कांतारा हा चित्रपट सप्तमीला कलाटणी देणारा ठरला आहे. या चित्रपटातील तिच्या लीला या व्यक्तिरेखेने सप्तमीला घराघरात पोहोचवले आहे.