'पू'ची भूमिका कोणीही करू शकत नाही; करीनाने आयकॉनिक रोलबद्दल असे का म्हंटले?

Shweta Shigvan-Kavankar

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरचे कभी खुशी कभी गम चित्रपटातील 'पू' हे पात्र खूप चर्चेत होते.

22 वर्षांनंतरही करीना कपूरचे हे पात्र अजूनही लोकांच्या मनात आहे आणि लोक अनेकदा 'पू'ची नक्कल करताना दिसतात.

एका मुलाखतीदरम्यान करीनाने म्हंटले की, पू हे एक आयकॉनिक पात्र होते. काही पात्रांना स्पर्श करू नये. ते जसे आहेत तसे त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे.

पूची भूमिका कोणीही करू शकत नाही आणि करू नये, असेही तिने म्हंटले आहे.

करीना कपूरला कोणत्या पात्राचा ड्रेस आताच्या ट्रेंडमध्ये आणायची इच्छा आहे, असे विचारले असता तिने 'पू'च्या 'बोले चुडिया' आउटफिटचे म्हणाली.

करीना कपूरने चित्रपटसृष्टीत दोन दशके पूर्ण केली आहेत.

करीना शेवटची 'लाल सिंह चड्ढा'मध्ये दिसली होती. यामध्ये तिने आमिर खानसोबत स्क्रीन शेअर केली होती.

मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.

आता करीना कपूर लवकरच 'द क्रू' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमात करीना व्यतिरिक्त क्रिती सेनन आणि तब्बू सारखे स्टार्स दिसणार आहेत.