दीड लाखांच्या ड्रेसमध्ये कियाराची बॉसी स्टाईल

Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत कियारा अडवाणीचे नाव सामील झाले आहे.

कियारा सध्या सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे.

कियारा तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या स्टाइलसाठीही ओळखली जाते.

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या पोस्ट शेअर करत असते.

कियारा अडवाणीने नुकतेच इंस्टाग्रामवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

कियाराने वर्सासचा सिल्व्हर कॉर्सेट टॉप आणि ब्लॅक फॉक्स लेदर पँट घातली होती.

कियाराने तिच्या हातात मॅचिंग हिल्स असलेली एक मिनी पर्स देखील घेतली होती

स्मोकी आय मेकअपमुळे अभिनेत्रीचे सौंदर्य खुलून दिसत होते.

कियारा अडवाणीच्या या लूकचे चाहते दिवाने झाले असून फोटोवर कमेंटसचा पाऊस पडत आहे.

तर, काही युजर्सने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्नही केला आहे. आमच्याकडे अशा साहित्याचा बनलेला तंबू आहे, अशी कमेंट एकाने केली आहे.