24 कॅरेट गोल्ड साडीमध्ये क्रिती सेननचा सिंपल लूकने वेधले लक्ष

Shweta Shigvan-Kavankar

क्रिती सॅनन अलीकडेच आदिपुरुषच्या ट्रेलर लाँचला उपस्थित होती.

यावेळी अभिनेत्रीने अतिशय सुंदर साडी नेसली होती.

क्रिती सेनॉनचा हा साडीचा लूक चांगलाच व्हायरल होत आहे.

क्रिती सेननने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

या साडीला सोनेरी आणि लाल रंगाची बॉर्डर आहे. या साडीवर २४ कॅरेट सोन्याच्या खादी ब्लॉक प्रिंट्स बनवण्यात आल्या आहेत. यामुळे साडी अधिकच सुंदर दिसत आहे

या साडीचे फॅब्रिक केरळी कॉटन असून डबल ड्रेप आहे. या साडीसोबत क्रितीने कॉपर कलरच्या या ब्लाउजवर फुल आणि पाचूचे काम करण्यात आले आहे.

क्रितीने केसाचा अंबाडा घातला असून यावर पांढरी फुले घातली आहे.

सोबत तिने हातात गोल्डन ब्रेसलेट आणि स्टड कानातले घातले आहेत.

या साडीमध्ये क्रिती खूपच सुंदर दिसत होती.