Shweta Shigvan-Kavankar
चित्रपटसृष्टीत सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीनंतर आता अभिनेत्री मानवी गाग्रूने कुमार वरुणसोबत लग्नगाठ बांधली आहे.
जानेवारीमध्ये त्यांनी रिलेशनशिपमध्ये असल्याची घोषणा केली होती.
जवळच्या मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत मानवी गाग्रूने लग्न केले आहे.
या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मानवी लाल लग्नाच्या पोशाखात सुंदर दिसत होती तर वरुणने पांढरी शेरवानी परिधान केली होती.
मानवी आणि कुमार वरुण यांनी आज संध्याकाळी एक पार्टी आयोजित करण्याची योजना आखली आहे.
फोटो पोस्ट करण्यासोबतच जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, तुम्ही आमच्या वैयक्तिक प्रवासात आम्हाला प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. आमच्या एकत्र प्रवासासाठी आम्हाला आशीर्वाद देत रहा.
सर्व सेलिब्रिटींनी नवविवाहित जोडपे मानवी आणि कुमार वरुणवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मानवी गाग्रूने पिचर्स, ट्रिपलिंग्ज आणि 'फोर मोअर शॉट्स प्लीज' या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तसेच, 'पीके', 'उजदा चमन' आणि 'शुभ मंगल ज्यादा सावधान' यांसारख्या चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका तिने साकारल्या आहेत.
तर, कुमार वरुण एक लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन असण्यासोबतच एक क्विझ मास्टर देखील आहे. त्याने 'लखों में एक' आणि 'चाचा विधायक हैं हमारे' सारख्या शोमध्येही काम केले आहे.