Milind Soman : मिलिंद सोमण-अंकिताचं इजिप्तमध्ये रोमँटिक फोटोशूट

Team Lokshahi

अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमण हा त्याच्या फिटनेटच्या अंदाजाने आणि लूकमुळे नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. त्याच्या लूकवर सर्वच फिदा होतात. मिलिंद नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

नुकतेच मिलिंद आणि त्याची पत्नी अंकिता कोनवार सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी इजिप्तला गेले आहेत.

त्यांनी इजिप्तमधील पिरॅमिडजवळ रोमँटिक फोटोशूट केले आहे.

मिलिंद व अंकिताने समुद्रात स्कूबा डायव्हिंग देखील केले आहे.

त्यांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.

स्कूबा डायव्हिंग करतानाचा मिलिंद-अंकिताचा खास फोटो. हे रोमँटिक फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. लग्न झाल्यापासून या दोघांच्या वयातील अंतरामुळे ही जोडी फार चर्चेत होती.