Mira Rajput Saree Cost: मीरा राजपूतने सिडकियाराच्‍या रिसेप्‍शनमध्‍ये नेट साडी नेसण्‍यासाठी लाखो रुपये केले खर्च

shweta walge

अलीकडेच मीरा शाहिद कपूरसोबत सिडकियारा यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी जैसलमेरला गेली होती. यानंतर शाहिदसोबत मुंबईतील ग्रँड रिसेप्शनला हजेरी लावली. यावेळी मीरा न्यूड कलरची साडी परिधान करताना दिसली. या साध्या दिसणाऱ्या साडीसाठी मीराने किती पैसे खर्च केले ते जाणून घ्या.

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या मुंबईतील लग्नाच्या रिसेप्शनला न्यूड नेट साडी परिधान करून गेली होती. मीराने या साडीसोबत चमकदार ब्लाउज घातला होता. ज्यात ती कहर करत होती.

मीराची ही साडी तिच्या लुकमध्ये भर घालत होती. तिचा साडीचा लुक पूर्ण करण्यासाठी, मीराने डायमंड कानातले घातले आणि मोकळे केस आणि सटल मेकअपसह कॅमेरासमोर तिचा परफेक्ट लुक दाखवला.

मीरा राजपूतच्या या साडीची किंमत सुमारे 1 लाख 95 हजार रुपये आहे. मीराने सिद्धार्थ कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शन लूकचे आणखी काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांना खूप आवडतात.

याशिवाय मीरा राजपूतने सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचे आणि मेहंदी लूकचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांचा लूक खूपच आकर्षक दिसत आहे.