कान्सच्या रेड कार्पेटवर मौनीचा स्टनिंग लूक; चाहत्यांच्या खिळल्या नजरा

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री मौनी रॉयने टीव्हीनंतर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला आहे.

मौनीने कान्स 2023 च्या रेड कार्पेटवर पदार्पण केले आहे.

तिने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले असून आता ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यामध्ये तिने स्ट्रॅपलेस गाउन घातला होता. सोबत बाउचरॉन नेकपीस घातला होता.

फोटो शेअर करताना मौनीने लिहीले की, आज रात्री कान्सच्या रेड कार्पेटवर. यासोबतच तिने टीमचेही आभार मानले आहेत.

मौनीच्या या फोटोवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या असून कमेंटसचा वर्षाव केला आहे.

सेलिब्रिटींनी मौनीचे अभिनंदन केले आहे, तर चाहत्यांनी हार्ट इमोजीने कमेंट बॉक्स भरला आहे.