'नागिन' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली! 4 दिवस ICU मध्ये

Shweta Shigvan-Kavankar

बिग बॉस आणि नागिन फेम अभिनेत्री मेहक चहल मागील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होती.

मेहकची तब्येत अचानक बिघडली, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

मेहक जवळपास ३-४ दिवस आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होती. अभिनेत्रीने आता तिच्या तब्येतीचे अपडेट चाहत्यांशी शेअर केले आहेत.

मेहकने सांगितले की, मला न्यूमोनिया झाला असून मी 3-4 दिवस आयसीयूमध्ये ऑक्सिजन व्हेंटिलेटरवर होते. 2 जानेवारीला मी अचानक कोसळले. मला श्वासही घेता येत नव्हता.

हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर मला लगेच अॅडमिट करण्यात आलं. मी अजूनही रुग्णालयात आहे आणि मला येथे 8 दिवस झाले आहेत. माझ्या तब्येतीत बरीच आता सुधारणा झाली आहे.

पण ऑक्सिजनची पातळी अजूनही चढ-उतार आहे. माझ्या फुफ्फुसांना संसर्ग झाला होता, अशी मेहक म्हणाली.

मेहक पुढे म्हणाली, जेव्हा श्वास थांबायला लागला तेव्हा मला खूप भीती वाटली, कारण माझ्या आयुष्यात अशी वेळ कधीच आली नव्हती. जेव्हाही मला खोकला येत असे तेव्हा मला खूप वेदना होत होत्या.

मेहक चहल सध्या टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो नागिन 6 मध्ये दिसत आहे. मेहक सलमान खानच्या बिग बॉस 5 या शोचा भाग देखील आहे.

मेहक खतरों के खिलाडी या शोमध्येही दिसली होती. तिने चित्रपटांमध्ये आयटम साँगही केले आहेत.