राणा दाम्पत्य 10 दिवस सुट्टीवर; फोटो व्हायरल

Shweta Shigvan-Kavankar

अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे नेहमीच विरोधकांवर आक्रमकपणे टीका करताना दिसतात.

परंतु, आता राजकारणातून राणा दाम्पत्यांने ब्रेक घेतला आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा सध्या आपल्या मुलामुलीसह परदेश दौऱ्यावर गेले आहेत.

राणा दाम्पत्याने १० दिवसांची सुट्टी घेत परदेशवारी सुरू आहे.

यादरम्यानचे राणा दाम्पत्याचे परदेशवारीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

यात फ्रान्स देशातील पॅरिस, आयफेल टॉवरला त्यांनी भेट दिली.

तर विदेशातही आपल्या भारतीय संस्कृती व वेशभूषेचे पालन नवनीत राणा यांनी केल्याचे फोटोंवरुन दिसत आहे.

बाबा रामदेव यांच्या आश्रमात नवनीत यांची रवी राणा यांच्याशी ओळख झाली होती.

यानंतर 2 फेब्रुवारी 2011 रोजी एका सामुहिक विवाह सोहळ्यात नवनीत व रवी राणा यांचा विवाह झाला होता.