Shweta Shigvan-Kavankar
मुंबईतील सुप्रसिद्ध चित्रकार अरबिंदा सामंता यांनी आपल्या चित्रात स्वप्ननगरी मुंबईचे वास्तव आपल्या अनोख्या शैलीत साकारले आहे.
गेल्या २० वर्षात त्यांनी मायानगरी मुंबईचं अनोखं रूप अगदी जवळून पाहिलं आहे.
मुंबई हा त्यांचा आत्मा आहे, त्यांच्या चित्रात मुंबईच्या आत्म्याशी असलेले घनिष्ट नातं स्पष्ट करते.
अरबिंदा सामंता, एक अतिशय प्रतिभावान कलाकार असून त्यांनी महानगरी मुंबईची वैशिष्ट्ये अतिशय अभिनव पद्धतीने शोधली आहेत.
मायानगरी मुंबईसारख्या मोठ्या शहरात घडणाऱ्या आजूबाजूंच्या प्रत्येक परिस्थितीचे त्यांनी बारीकसारीक निरीक्षण केले आहे.
कष्टकऱ्यांची मुंबई, श्रीमंतांची मुंबई, स्वप्न पाहणाऱ्यांची मुंबई, पावसात भिजणारी मुंबई, ग्रीन मुंबई अशी मुंबईची अनेक रूपं आणि वैशिष्ट्य त्यांनी आपल्या चित्रात साकारली आहेत.
महानगरी मुंबईचे वास्तव मानवी मनातील दुर्दम्य भावना, आसक्ती, प्रेमभावना, भक्ती तसेच समर्पण, निरामयता, समरसता व तादाम्य वगैरे भावनांचे विविध पैलू वैशिष्ट्यपूर्ण शैलीत मांडले आहेत.
त्यांचा हा कलाविष्कार आकर्षक मांडणी, रचना आणि रंगसंगती हयामुळे मनोवेधक व पुरेसा बोलका झाला आहे.
अरबिंदा सामंता यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन नरीमन पॉइंट येथील बजाज भवनमध्ये असलेल्या कमलनयन बजाज आर्ट गॅलरीमध्ये २६ फेब्रुवारी ते ४ मार्च यादरम्यान रसिकांना पहायला मिळणार आहे