परिणीती चोप्राने राघव चढ्ढासोबतच्या नात्याबाबत सोडलं मौन; म्हणाली...

Shweta Shigvan-Kavankar

गेल्या काही दिवसांपासून आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा यांच्या नात्याची जोरदार चर्चा आहे.

राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा अनेकदा एकत्र दिसले आहेत.

यावरुन हे कपल एकमेकांना डेट करत असून लवकरच दोघेही लग्न करणार असल्याच्याही चर्चा आहेत.

राघव चड्ढाला डेट करण्याच्या चर्चेदरम्यान आता परिणीती चोप्राने पहिल्यांदाच उघडपणे बोलली आहे.

एका मुलाखतीत परिणीती चोप्राने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले.

चर्चा करणे आणि अपमान करणे यात खूप पुसट रेषा असते, असे परिणीती म्हणाली.

ती पुढे म्हणाली की असे झाले तर, काही गैरसमज आहे का ते स्पष्ट करेल.

जर स्पष्टीकरण देणे आवश्यक नसेल तर ती स्पष्टीकरण देणार नाही, असेही परिणीती म्हणाली आहे.

परिणीती जेव्हापासून राघव चड्ढासोबत लंच डेटवर दिसली होती. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आहेत.