प्रियंका चोप्राने दाखवली एक वर्षाची मुलगी मालतीची सुंदर झलक; केले खास फोटोशूट

Shweta Shigvan-Kavankar

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांची मुलगी मालती मेरी एक वर्षाची झाली आहे.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये दोघांनीही सरोगसीच्या माध्यमातून पालक बनल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.

तेव्हापासून आजतागायत प्रियांका आणि निक यांनी चाहत्यांसमोर मुलीचा चेहरा उघड केला नाही.

पण ती मालतीसोबतचे एक ना एक फोटो शेअर करत असते.

प्रियंका चोप्राने मुलगी मालतीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये प्रियंकाने केस मोकळे ठेवून आणि गळ्यात नेकलेस घातलेले दिसत आहे. तर प्रियांकाची मुलगी मालतीने मॅचिंग रेड कलरचा फ्रॉक घातलेला दिसला.

हा फोटो शेअर करत प्रियांकाने इंस्टाग्रामवर लिहिले- 'आमच्या एकत्र असा पहिला फोटो...'

प्रियंका चोप्राने वोग मासिकासाठी मुलगी मालती मेरीसोबत तिचे पहिले फोटोशूट केले आहे.

प्रियंका या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत असून चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.