'या' अभिनेत्याने घातला चक्क बॅकलेस ब्लेझर

Shweta Shigvan-Kavankar

'फुकरे' अभिनेता पुलकित सम्राट सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो.

तो अनेकदा त्याचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर करत असतो.

नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

यात त्याने बॅकलेस ब्लॅक कलरचा सूट घातला होता

पुलकितने यासोबत जपानी स्टाईलमध्ये ब्लू बेल्ट देखील घातला होता.

त्याने काळ्या रंगाचे शूज आणि चष्मा घालत आपला लूक पूर्ण केला.

पुरूषांच्या फॅशनला चालना देणार्‍या पुलकितचे अनेकांनी कौतुक केले. तर काहींनी त्याला ट्रोल केले आहे.

एका यूजरने 'पीछे से फटा हुआ है' असे लिहिले, तर दुसऱ्या यूजरने 'उर्फी जावेदपासून दूर राहा' असे म्हटले.