...त्यावेळी रणबीरने केले आलियाला सिनेस्टाईल प्रपोज; फोटो आता होतोयं व्हायरल

Shweta Shigvan-Kavankar

रणबीर कपूर आणि आलिया भट्टसाठी २०२२ हे वर्ष खूप सुंदर गेले.

दोघांनी प्रथमच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र काम केले आणि तो खूप हिट ठरला.

गर्लफ्रेंड आलिया आणि बॉयफ्रेंड रणबीर पती-पत्नी बनले.

वर्षाच्या शेवटी दोघेही आई-वडील झाले.

नुकताच रणबीर आणि आलियाचा एक फोटो व्हायरल होत आहे.

या फोटोत रणबीर सिनेस्टाईल आलियाला प्रपोज करताना दिसत आहे.

आलियाला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी रणबीर हातात अंगठीचा बॉक्स घेऊन तिच्यासमोर गुडघ्यावर बसलेला दिसतो.

हे पाहून आलिया आश्चर्यचकीत झालेली दिसत आहे.

रणबीरने आलियाला लग्नाचा प्रपोज आफ्रिकेच्या 'मसाई मारा' जंगलात केले होते.

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.