आयपीएलपूर्वीच 'या' RCB स्टारने केले लग्न; फोटो व्हायरल

Shweta Shigvan-Kavankar

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार क्रिकेटपटू वनिंदू हसरंगा विवाहबंधनात अडकला आहे.

वनिंदू हसरंगाने 9 मार्च रोजी त्याची मैत्रीण विंद्या पद्मपेरुमासोबत सात फेरे घेतले.

हसरंगा आणि विंद्याच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वनिंदू हसरंगा याने लग्नासाठी पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता.

दुसरीकडे, विंद्या पद्मपेरुमा पांढऱ्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती.

25 वर्षीय वानिंदू हसरंगा याला आरसीबीने आयपीएल 2023 साठी कायम ठेवले होते.

नॅशनल असाइनमेंटमुळे वानिंदू हसरंगा आयपीएल 2023 मधील काही सामने मिस करु शकतो.