आनंद, हक्काची जागा अन्...; लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रितेशची जिनिलीयासाठी खास पोस्ट

Shweta Shigvan-Kavankar

महाराष्ट्राचे लाडके जोडपे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या लग्नाला आज 11 वर्षे पूर्ण झाली आहेत.

जवळपास 11 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश जेनेलियाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न केले.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त रितेशने त्याची पत्नी जिनिलीयासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जिनिलीयाबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोला खास कॅप्शन देत रितेशने माझा आनंद, हक्काची जागा आणि माझं आयुष्य…बायको, लग्नाच्या ११व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अशा खास शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.

'तुझे मेरी कसम'च्या शूटिंगदरम्यान पहिल्यांदा रितेशला भेटली.

जेनेलियाला रितेश गर्विष्ठ वाटत होता. परंतु, तो एक चांगला व्यक्ती असल्याचे तिला समजले.

मैत्रीपासून सुरू झालेल्या या नात्याचे हळूहळू प्रेमात कधी रूपांतर झाले. नंतर ते दोघेही लग्नबंधनात अडकले.

रितेश-जिनिलीया वेड चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले.‘वेड’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.