ऋतुराज गायकवाडच्या घरी लगीनघाई; मेहंदी सोहळ्यातील साधेपणा नेटकऱ्यांना भावला

Shweta Shigvan-Kavankar

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋतुराज गायकवाड लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

ऋतुराज ३ जून रोजी उत्कर्षा पवारसोबत विवाहबद्ध होणार आहे.

ऋतुराजच्या घरी आता लगीनघाई सुरु झाली आहे.

ऋतुराज-उत्कर्षा यांच्या मेहंदी सोहळा पार पडल असून याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या फोटोत ऋतुराजच्या मेहंदीचे डिझाईन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

ऋतुराज-उत्कर्षाचे साधेपणा पाहून नेटकरी भारवले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

२४ वर्षीय उत्कर्षा पवार महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते.

उत्कर्षा ही उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज आहे.

उत्कर्षा पवार आणि ऋतुराज हे देखील IPL 2023 च्या फायनलमध्ये एकत्र दिसले होते.

26 वर्षीय ऋतुराज गायकवाडने भारतासाठी 1 एकदिवसीय आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत आणि एकूण 154 धावा केल्या आहेत.