अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'मध्ये साई पल्लवीची एन्ट्री

Shweta Shigvan-Kavankar

अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले असून आता चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

त्याच्या दुसरा भाग पुष्पा द रुलवर काम सुरू झाले आहे.

या चित्रपटात आता साऊथ अभिनेत्री साई पल्लवी एन्ट्री करणार आहे.

या चित्रपटातील एका खास भूमिकेत ती झळकणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या चित्रपटात तिची भूमिका एका आदिवासी महिलेची असल्याचीही चर्चा आहे.

सध्या याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र तसे झाल्यास चाहत्यांसाठी आनंदाची बाब असेल.

अल्लू अर्जुन आणि साई पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत.

साईची फॅन फॉलोइंग केवळ दक्षिणेतच नाही तर हिंदी प्रेक्षकांमध्येही चांगली आहे.

पुष्पामधील साई पल्लवीचा लूक पाहण्यासाठी आता चाहते उत्सुक झाले आहेत.