'मराठी उर्फी जावेद'; सई ताम्हणकर नव्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर ट्रोल

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सई ताम्हणकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावर फिल्मफेअर अवॉर्ड्ससाठी काही फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये सईने निळ्या कलरचा गाउन परिधान केला आहे.

केसांचा बन घालत सईने ड्रेसला शोभेल असा आय मेकअप केला आहे.

तिचे हे फोटो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोवर चाहत्यांनी कमेंटसचा वर्षाव केला आहे.

काहींनी तिचे कौतुक केले आहे. तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

एका चाहत्यांने तिला जलपरी म्हंटले. तर दुसऱ्याने मराठीतील उर्फी जावेदची उपमा दिली आहे.

सई ताम्हणकर नुकतीच मीडियम स्पाईसी चित्रपटात झळकली होती.