अभिनेत्रीचा 'सई' रे लूक चाहत्यांना भावला; कमेंटचा पाऊस

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे.

सई ही केवळ चित्रपटांमध्येच प्रसिद्ध नसून, सोशल मीडियावरही तिचा चाहतावर्ग मोठा आहे.

सोशल मीडियावर तिचे विविध लूक्समधील फोटोज शेअर करत असते.

नुकतेच तिने सोशल मीडियावर समर फोटोशूट शेअर केले आहेत.

यामध्ये सईने आकाशी रंगाची फ्लोरल प्रिंट साडी घातली असून केस मोकळे सोडले आहेत.

'समरींग इन साडी' असे कॅप्शनही तिने या फोटोंना दिले आहे.

यामध्ये सई खूपच सुंदर दिसत असून चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

एका युजरने लिहले की, सुंदरा तर आणखी एकाने खूबसूरत म्हणत हार्ट आणि फायरचा इमोजी शेअर केला आहे.

तर, अभिनेत्री श्रेया बुगडेने सुपर स्टनिंग अशी कमेंट केली आहे.