सामंथा रुथ प्रभूच्या आजाराची युजरने उडवली खिल्ली, अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर...

Shweta Shigvan-Kavankar

साऊथची सुपरहिट अभिनेत्री समंथा रुथ प्रभू गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे.

समंथाला मायोसिटिस नावाचा गंभीर आजार आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

अलीकडेच समंथा रुथ प्रभू तिच्या आगामी 'शकुंतला' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी दिसली.

यानंतर तिचा एक फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे.

यामध्ये सामंथासाठी वाईट वाटले, तिने तिचे चार्म आणि ग्लो गमावली आहे. ती घटस्फोटातून सामर्थ्याने बाहेर आली आणि तिची कारकीर्द उंचीला स्पर्श करत आहे, तेव्हा मायोसिटिसने तिला वाईटरित्या तोडले.

यानंतर समंथाने या पोस्टला रिट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मी प्रार्थना करतो की तुम्हाला माझ्यासारखे अनेक महिने उपचार आणि औषधोपचार सहन करावे लागू नयेत. आणि तुमचा ग्लो वाढवण्यासाठी माझ्याकडून थोडेसे प्रेम, असे समंथाने म्हंटले आहे.

समांथाची ही पोस्ट वाचल्यानंतर चाहते तिच्या पाठीशी उभे आहेत. आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

एका चाहत्याने लिहिले की, तू आतून सुंदर आहेस आणि तुझे हृदयही खूप सुंदर आहे.

तर दुसर्‍याने लिहिले की, तू तुझे सौंदर्य गमावले नाहीस. तर, तुझे सौंदर्य आणखी वाढले आहे.