'ऊ अंटावा’ आयटम साँगबद्दल समांथाचा मोठा खुलासा; म्हणाली, घटस्फोटामुळे...

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिची फॅनफॉलोंईंगही मोठी आहे.

'पुष्पा' चित्रपटातील 'ऊ अंटावा' या गाण्याने समंथाला खूप प्रसिद्धी मिळाली.

समंथा रुथ प्रभूचा शाकुंतलम हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

यावेळी तिने तिच्या आयुष्यातील घटस्फोटनंतरच्या वेदना सांगितल्या.

अभिनेत्रीने सांगितले की, नागा चैतन्यसोबत तिचे नाते आधीच तुटले होते आणि घटस्फोटाचा खटला कोर्टात सुरू होता.

'ऊ अंटावा' हे गाणे ऑफर केले असता पालकांनी ते करण्यास नकार दिला. माझी प्रतिमा डागाळली जाईल, अशी भीती सगळ्यांना वाटत होती. मात्र सर्वांच्या नकारानंतरही समंथाने ते गाणे केले.

समंथा म्हणाली, माझी हरकत नाही, मी घटस्फोट घेत आहे याचा अर्थ मी काही चूक केली आहे असा होत नाही.

मी माझ्या लग्नाला पूर्ण वेळ दिला होता. परंतु, ते लग्न टिकले नाहीतर त्यात पाप नाही, असेही तिने म्हंटले आहे.

समांथा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत येते.

समांथा सिटाडेल या वेबसीरिजमध्येदेखील झळकणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक जोडी राज आणि डीके हे या वेबसीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत.