संस्कृती बालगुडेचा मोहक अंदाज फॅन्सना पडतो भारी

Shweta Shigvan-Kavankar

संस्कृती बालगुडे हिचा आज वाढदिवस.

चित्रपट, मालिका या दोन्ही क्षेत्रांमध्ये वावरणारा तरुण चेहरा म्हणजे संस्कृती बालगुडे.

लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयामधून तिनं भरत नाट्यमच्या परीक्षा दिल्या आहेत.

ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत.

तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती.

‘शॉर्टकट’, ‘शिनमा’, ‘सांगतो ऐका’, ‘माकडाचं लगीन’, ‘भाय’, ‘एफयु-फ्रेंडशिप अनलिमिटेड’, ‘लग्न मुबारक’, ‘रे राया’ हे तिचे काही महत्त्वाचे चित्रपट.

'पिंजरा’, ‘विवाहबंधन’, ‘जल्लोष सुवर्णयुगाचा’ या लोकप्रिय मालिकाही संस्कृतीच्या नावावर आहेत.

तिने शेअर केलेल्या काही फोटोंमुळे ती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे