पांढऱ्या साडीत खुललं सीरत कपूरचं सौंदर्य; नेटकरी फिदा

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री सीरत कपूर फॅशन आयकॉनपैकी एक आहे.

तिने अलीकडेच हैदराबादमध्ये झालेल्या लक्ष्मी मंचूच्या चॅरिटी शोमधील एक फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्रीने वरुण चक्किलमच्या कलेक्शनमधून तिच्या पांढऱ्या साडी परिधान केली होती.

संपूर्ण साडी मोटिफ्स आणि हँडवर्क डिझाइन्सने सजलेली होती. सोबत तिने नक्षीदार फुल स्लीव्ह ब्लाउज घातला होता.

तर, अॅक्सेसिरिजमध्ये कानातले आणि नाजूक नेकलेसने लूक पूर्ण केला. व लाईट मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

सीरत स्टेजवर येताच सर्वच प्रेक्षकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

यावेळी सीरत म्हणाली की, दरवर्षी अशा कार्याशी निगडीत राहण्याची संधी मिळाल्याने मला आनंद होत आहे. मी माझ्या करिअरची सुरुवात एक कलाकार म्हणून रंगमंचावरून केली. त्यामुळे रंगमंचावर राहणे माझ्यासाठी नेहमीच आनंददायी होते.

मी रंगमंचावर असते तेव्हा ते मला घरात असल्यासारखं वाटतं; मला जिवंत वाटतं, असे तिने म्हंटले आहे.

सीरत कपूर लवकरच दिल राजूच्या पुढच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.