लाल हाय स्लिट ड्रेसमध्ये शहनाजचा किलर लूक, चाहते घायाळ

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री शहनाज गिल अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

नुकताच तिने नवीन फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

यात तिने लाल रंगाच्या हाय स्लिट ड्रेस गाऊन घातला असून केस मोकळी सोडली आहेत.

शहनाज गिल समुद्रकिनाऱ्यावर दिसत असून ती आपल्या स्टाईलने मन जिंकत आहे.

शहनाजचे ही बोल्ड आणि ब्युटीफुल फोटोंवर चाहत्यांनी कमेंटसचा पाऊस पाडला आहे.

शहनाज गिल नुकतीच गुरु रंधावासोबत मून राइज या गाण्यात दिसली होती.

आजकाल शहनाज तिचा देसी वाइब्स शो होस्ट करत आहे.

शहनाज लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

या वर्षी ती सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसणार आहे.

विशेष म्हणजे बिग बॉसनंतर शहनाज गिलला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. या शोमध्ये शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.