श्रद्धा आर्याने केले चक्क 10वे लग्न; चाहते अवाक्

Shweta Shigvan-Kavankar

श्रद्धा आर्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

श्रद्धा सोशल मीडियावरुन चाहत्यांसोबत नेहमीच कनेक्ट असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

तिने नुकतेच विवाह मंडपातील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंची आता चांगलीच चर्चा रंगली आहे.

श्रद्धाने कॅप्शमध्ये लिहीले की, जेव्हा एकाच मालिकेत तुम्ही १० वेळा विवाहबंधनात अडकता. तेव्हा का, कधी व कोणाबरोबर याची तुम्ही पर्वा करत नाही, असे तिने म्हंटले आहे.

यामुळे श्रद्धा आर्या पुन्हा विवाहबंधानात अडकल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

परंतु, श्रद्धाने शेअर केलेले फोटो हे मालिकेच्या सेटवरील आहेत.

श्रद्धा आर्या सध्या ‘कुंडली भाग्य’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

यातील एक सीन शूट करताना श्रध्दाने तब्बल १० वेळा लग्नगाठ बांधली आहे.

श्रद्धा आर्या खऱ्या आयुष्यात 2021 रोजी राहुल नागल यांच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे.