श्रध्दा कपूरचे पैठणी प्रेम; नव्या लूकवर चाहते फिदा

Shweta Shigvan-Kavankar

श्रध्दा कपूर नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहत असते.

तिचे मराठीवरील प्रेम सर्वांनाच माहिती आहे.

अनेकदा तिने मराठमोळ्या लुकमध्ये फोटोशूट केल्याचं पाहायला मिळालं आहे.

आता पुन्हा एकदा ती एका वेगळ्या लूकमुळे चर्चेत आली आहे.

श्रध्दाने पैठणीला एक हटके लूक दिले असून त्याचे फोटो आपल्या इन्टाग्रामवर शेअर केला आहे.

यामध्ये तिने लाल रंगाच्या पैठणीपासून शिवलेला ब्लेझर आणि ट्राऊझर पॅन्ट घातली आहे.

यावर तिने सिंम्पल मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहे.

या पोस्टला तिने पैठणी पॉवर अशी कॅप्शन दिली आहे.

श्रध्दाचा हा लूक चाहत्यांनाही चांगलाच पसंतीस उतरला असून तिच्यावर कमेंटचा वर्षाव करण्यात येत आहे.

श्रध्दा लवकरच रणबीर कपूरसह TJMM या चित्रपटात दिसणार आहे.