सोनम कपूरचा रॉयल लुक; दोन देशांच्या डिझायनर्सनी बनवला खास गाऊन

Shweta Shigvan-Kavankar

70 वर्षांनंतर ब्रिटनमध्ये किंग चार्ल्स III च्या राज्याभिषेक सोहळ्यानंतर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सोनम कपूर सहभागी झाली होती.

किंग चार्ल्सच्या राज्याभिषेक सोहळ्यानंतर शाही शैलीत सोनम कपूरने कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली.

यावेळी तिने दोन देशांचे प्रतिनिधित्व करणारा गाऊन परिधान केला होता.

अनामिका खन्ना आणि न्यूझीलंडमध्ये जन्मलेली यूके-आधारित डिझायनर एमिलिया विकस्टेड यांनी सोनमचा गाऊन डिझाईन केला होता.

बेस्पोक फ्लोअर-लेंथ गाऊनमध्ये सोनम खूपच सुंदर दिसत होती.

सोनमने या गाऊनसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिने यासोबत आपले केस मोकळे ठेवले असून छोटे स्टोन कानातले घातले होते.

सोनम कपूरनेही राज्याभिषेकेच्या खास प्रसंगी भाषण केले. याचे तिच्या कुटुंबीयांनी खूप कौतुक केले.