तिची अधुरी प्रेमकहाणी! उर्वशी-पंतच्या प्रेमकथेवर येणार गाणे?

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री उर्वशी नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते.

उर्वशी लवकरच आता एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. 'तौबा मेरी तौबा' या गाण्यात ती झळकणार आहे.

उर्वशीचे गाणे हे 6 फेब्रुवारीला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

या गाण्यात उर्वशी टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता शरद मल्होत्रासोबत दिसणार आहे.

हे गाणे ममता शर्माने गायले आहे. हे प्रेम गीत आहे.

गाण्यात त्यांचे प्रेम, पहिली भेट आणि ब्रेकअपची वेदना दाखवण्यात येणार आहे.

उर्वशीने कॅप्शनमध्ये लिहीले की, माझे नशीब वाईट नव्हते, ती व्यक्तीही वाईट नव्हती, ज्या वेळी मी प्रेमात पडलो, तो काळ वाईट होता.

यावरुन चाहत्यांनी या गाण्याची संबंध ऋषभ पंतशी लावला आहे.

उर्वशी रौतेलाचे हे गाणे तिच्या आणि क्रिकेटर ऋषभ पंतच्या अधुरी प्रेमकथेवर आधारित असल्याची चर्चा सुरु आहे.

नेहमीप्रमाणे उर्वशीच्या पोस्टवर लोक मजा घेत आहेत. अनेकांनी ऋषभ पंतचे नाव घेऊन अभिनेत्रीला ट्रोल केले आहे.

परंतु, सत्य काय आहे हे 6 फेब्रुवारीला कळेल. 'तौबा मेरी तौबा'चे पहिले पोस्टर शेअर केले आहे.