मराठी कलाकारांच्या मंगळसूत्रांच्या हटके स्टाइल; डिझाईन पाहा

Siddhi Naringrekar

अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही काही वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाली. मात्र तिच्या मंगळसूत्राच्या डिझाईनची चर्चा असते.

अभिनेत्री अभिज्ञा भावेने तिचे मंगळसूत्र खास अनोख्या स्टाईलचे बनवले आहे. तिच्या मंगळसूत्रामध्ये एम आणि ए ही दोन्ही इंग्रजीमधील अक्षरे दिसत आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने काही महिन्यांपूर्वी लग्नाच्या वाढदिवशी पुन्हा विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिच्या मंगळसूत्रानेही अनेकांचे लक्ष वेधले

अभिनेत्री ऋता दुर्गुळेने काही महिन्यांपूर्वी लगीनगाठ बांधली. तिच्या मंगळसूत्राचे डिझाईन फारच खास आहे.

अभिनेत्री अमृता पवार काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकली. तिच्या मंगळसूत्राची डिझाईन वेगळी आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची पत्नी मितालीचे मंगळसूत्राचे डिझाईनही फारच खास आहे.

काही महिन्यांपूर्वी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे विवाहबंधनात अडकले. तीच्या मंगळसूत्राची स्टाईल वेगळीत आहे.

हार्दिक जोशी-अक्षया देवधर शुक्रवार २ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. अक्षया-हार्दिकच्या पारंपारिक लूकसह मंगळसूत्रानेही लक्ष वेधून घेतले.

अभिनेता आशय कुलकर्णीनेही लगीनगाठ बांधली. त्याच्या पत्नीच्या मंगळसूत्राचे फोटोही समोर आले आहेत.