रुद्राक्षाची माळ अन् लुंगी; लेकीच्या लग्नात सुनील अण्णांचा पारंपारिक लूक

Shweta Shigvan-Kavankar

सुनिल शेट्टीची मुलगी व अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल हे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांचे आज खंडाळ्यात लग्न झाले.

लग्नाचे सर्व विधी अगदी खाजगी पद्धतीने पार पडले.

लग्न आटोपल्यानंतर सुनील शेट्टी बाहेर आले आणि मीडियाकर्मींना शुभेच्छा दिल्या.

सुनील शेट्टीने आपल्या मुलीच्या लग्नासाठी पारंपारिक दाक्षिणात्य पोशाख निवडला.

सुनीलने पेस्टल गुलाबी रंगाचा कुर्ता आणि मुंडू घातला होता. जो त्याच्यावर छान दिसत होता.

यासोबतच त्यांनी गळ्यात रुद्राक्ष आणि सोन्याची माळ घातली होती.

सुनीलसोबत त्यांचा मुलगा अहान शेट्टी यानेही सर्वांचे स्वागत केले आणि लाडू वाटले.

मला वडीलच राहायचे आहे, सासरचा टॅग हटवला तर बरे होईल, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

अथिया आणि केएल राहुलचा आयपीएलनंतर रिसेप्शन कार्यक्रम होणार असल्याची माहितीही सुनील शेट्टीने दिली आहे.