सुप्रिया सुळेंनी शेअर केला परदेशातील किस्सा; म्हणाल्या,मी परदेशात पॅन्ट घालून...

Shweta Shigvan-Kavankar

सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि देशातले महत्वाचे नेते शरद पवार यांच्या कन्या.

राजकारणात त्यांनी स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले आहे.

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी बारामती मतदारसंघातून निवडणुकीत मोठा विजय मिळवला. व त्यांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला.

नुकतेच त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात बोलताना परदेशातील एक किस्सा शेअर केला.

मी ज्यावेळेस परदेशात पॅन्ट घालून रस्त्याने चालते त्यावेळेस कोणी बघत पण नाही.

ते म्हणतात कोणीतरी भारतीय मुलगी चालली आहे रस्त्याने.

मात्र, मी जेव्हा साडी नेसून प्रदेशात रस्त्यावर उतरते त्यावेळेस मला विचारतात, इंडियन? व्हेरी ब्युटीफुल साडी! द वे टू बाय इंडिया.

या गोष्टी अनेक वेळा झाल्यात. न्यूयॉर्कमध्ये देखील झाले आहे.

सुप्रिया सुळे राजकरणात येतील अशी चर्चाही नसतांना २००६ मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले.

संसदेतही त्यांची कामगिरी लक्षणिय आहे. फेम इंडिया संस्थेच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट संसदपटू या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.