हृदयविकाराच्या झटक्यातून सावरल्यानंतर सुष्मिता सेन पहिल्यांदाच दिसली रॅम्पवर; चाहत्यांनी केले कौतुक

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियाद्वारे नेहमीच आपल्या चाहत्यांशी कनेक्ट असते.

काही दिवसांपुर्वी तिने हार्ट अर्टक आल्याचे सांगितले होते. यामुळे चाहते चिंतेत होते.

परंतु, आता पुर्ण फिट असल्याचे तिने सांगितले असून काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

यात लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर अभिनेत्री सुष्मिता सेनने शानदार रॅम्प वॉक केला.

यावेळी अभिनेत्री सुष्मिता पिवळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

लॅक्मे फॅशन वीकमध्ये सुष्मिता सेनने अनुश्री रेड्डीसाठी रॅम्प वॉक केला.

हे पाहून चाहते आनंदित झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले की, असे कधीच घडले नाही की ती आम्हाला प्रभावित करण्यात अपयशी ठरली आहे.

तर, दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, म्हणूनच ती सुष्मिता आहे. काही चाहत्यांनी तिला लीजेंड म्हंटले आहे.