Tejasswi Prakash : तेजस्वी प्रकाशला मिळाली 'या' रिअ‍ॅलिटी शोची ऑफर

shamal ghanekar

'बिग बॉस 15'ची (Bigg Boss Season 15) विजेतेपद पटकावणारी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सतत सोशल मिडियावर चर्चेत असते. ती सोशल मिडियावरही सक्रिय असते. तेजस्वी प्रकाशचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.

सध्या ती एकता कपूरच्या 'नागिन 6' (Naagin 6) या शोमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.

Tejasswi Prakash

छोट्या पडद्यावरील 'स्वर्गिनी' आणि 'सिलसिला बदलते रिश्तों का' या मालिकांमध्ये तेजस्वी प्रकाशने मुख्य भूमिका साकारली होती.

Tejasswi Prakash

तेजस्वी प्रकाशला सतत एकामागून एक ऑफर्स येत आहेत. अशातचं तिला एका रिअ‍ॅलिटी शोची ऑफर आली आहे. या रिअ‍ॅलिटी शोचं (Reality Show) नाव 'झलक दिखला जा' आहे.

Tejasswi Prakash

'झलक दिखला जा' (Jhalak Dikhla Ja) या रिअ‍ॅलिटी शोच्या नवीन सीझनची ऑफर तेजस्वी प्रकाशला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तेजस्वी प्रकाश 'नागिन 6' या शोला सोडणार असल्याचे बोलले जात आहे.

Tejasswi Prakash

तिने वयाच्या 18 व्या वर्षापासून फिल्मी करिअरला सुरूवात केली. लहानपणापासून मनोरंजन क्षेत्रात करिअर करायचे ठरवले होते. तिचे वडीलही गायक आहेत. तर तिलाही संगीताची आवड आहे.

Tejasswi Prakash