'प्राजक्तराज'च्या दागिन्यांची अभिनेत्रीने दाखवली झलक; तुम्ही पाहिलेत का?

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली.

कवयित्रीनंतर आता प्राजक्ता एका नवीन पर्वाला सुरुवात केली आहे.

'प्राजक्तराज' हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली आहे.

अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक आभूषणांच्या या नवीन शृंखलेच्या वेबसाईटचे राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

महाराष्ट्राच्या विविध भागातील आभूषणे 'प्राजक्तराज'च्या माध्यमातून तीने जगभरातील आभूषणप्रेमींसाठी आणली आहेत.

तिने नुकतेच या दागिन्यांचे फोटोशूट केले असून इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

तुळजा- सोन्याचे अलंकार, म्हाळसा- चांदीचे अलंकार, सोनसळा- तांब्यात घडवलेले अलंकार अशा अलंकाराची झलक पहिल्यांदा दाखविली आहे.

या आभूषणांमध्ये प्राजक्ता अत्यंत सुंदर दिसत असून चाहत्यांना तिच्या सौंदर्याची भुरळ पडली आहे.

ही आभूषणे चाहत्यांना पसंतीस उतरली असल्याचे दिसत आहेत.