डोक्यावर टोपी, हातात कॅमेरा; टायगर सफारीत दिसला पंतप्रधान मोदींचा नवा अवतार

Shweta Shigvan-Kavankar

8 एप्रिल रोजी कर्नाटकातील बांदीपूर येथे टायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली.

या दौऱ्यात पंतप्रधान मोदी वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसले.

पंतप्रधान मोदींनी डोक्यावर काळी टोपी घातली होती.

यासोबतच त्यांनी खाकी रंगाची पँट, कॅमफ्लाज टी-शर्ट आणि काळ्या रंगाचे शूज परिधान केले होते.

फोटोमध्ये पंतप्रधानांनी हातात Adventure Goblet स्लीव्हलेस जॅकेट घेतलेले दिसत आहे.

या दौऱ्यात नरेंद्र मोदींनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात 20 किलोमीटरची सफारी जीप राईडही केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेप्पाकडू एलिफंट कॅम्पलाही भेट दिली.

थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या हाताने हत्तींना ऊस खाऊ घातला.