Team Lokshahi
बॅालीवूड अभिनेत्री जूही चावलाचा आज 55 वा वाढदिवस आहे
जुही चावलाने ' कयामत से कयामत' या आमिर खानसोबतच्या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
जुहीने तीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.
जूहीने डर, फिर भी दिल है हिंदुस्तानी, हम है राही प्यार के, भूतनाथ, आणि मिस्टर अँड मिसेस खिलाडी अशा अनेक सुपरहिट चित्रपट काम केले आहे.
में कोई ऐसा गीत गाउ, अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए, बम्बइ से गई पुना अशी अनेक गाणी त्याकाळी खूप गाजली होती.
जुही चावला ही अभिनेत्रीसह निर्माती देखील आहे
जुही चावला ने 2000 साली शाहरूख खान आणि अझीझ मिर्झा यांच्यासोबत 'ड्रीमझ अनलिमिटेड' नावाची निर्मिती कंपनी उघडली. रोमँटिक कॉमेडी 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' हा चित्रपट या कंपनीची पहिली निर्मिती होती.
जुही ने 2016 साली 'चॉक एन डस्टर' या भारतीय खाजगी शिक्षण व्यवस्थेच्या व्यापारीकरणावर आधारित चित्रपटात काम केले होते.