डोरेमॉनची बहीण! निळ्या रंगाची लिपस्टिक लावल्याने उर्वशी रौतेला ट्रोल

Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या चर्चेत असते.

नुकतेच तिने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण केले.

उर्वशीने रेड कार्पेटवर आपल्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

यादरम्यानचे फोटोही उर्वशीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी उर्वशी नुकतीच मगरीचा हार घालून रेड कार्पेटवर पोहोचली होती.

तर, तिसऱ्या दिवशी उर्वशीने निळ्या आणि क्रीम रंगाचा गाऊन परिधान केला होता.

निळ्या रंगाच्या लिपस्टिकने तिने हा लूक कम्प्लीमेंट केला आहे. यानंतर तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.

एका यूजरने लिहिले, डोरेमॉनची बहीण दिसत आहे. तर दुसऱ्याने लिहिले, ऋषभ पंतच्या अफेअरमध्ये तिने हे काय केले?

जेव्हा उर्वशीला रेड कार्पेटवर पाहून फ्रेंच मीडियाने ऐश्वर्या-ऐश्वर्या ओरडायला सुरुवात केली.

विशेष म्हणजे ऐश्वर्या हे नाव ऐकून उर्वशी चिडली नाही, उलट तिने वळून पापाराझींना स्माईल दिली.