उर्वशी रौतेलाचा नवा लूक पाहून तुम्हीही घाबराल युझर्स म्हणाले, मगरीचे...

Shweta Shigvan-Kavankar

उर्वशी रौतेला फॅशनवर नेहमीच प्रयोग करत असते.

ती काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असते.

उर्वशीने नुकताच तिचा नवा लुक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हे पाहून चाहते गोंधळले आहेत.

या फोटोंमध्ये उर्वशीने मगरीचे डिझाइन केलेले दागिने घातले आहेत.

तिने मगरीचे डिझाइन असलेले कानातले, नेकपीस, बांगडी आणि अंगठी घालून पोज दिली आहे.

यामध्ये उर्वशी किलर दिसत असली तरी विचित्र अ‍ॅक्सेसरीजमुळे तिला ट्रोल करण्यात येत आहे.

यूजर्स पुन्हा उर्वशीला ऋषभ पंतच्या नावाने ट्रोल करत आहेत.

एका युझर्सने लिहिले की, ऋषभ पंतच्या अपघातामुळे दीदी दु:खी झाल्या असून हे त्यांचे मगरीचे अश्रू आहेत.

तर, दुसऱ्याने लिहिले की, माझा भाऊ रुग्णालयात आहे. आणि येथे फॅशन शो सुरू आहे.